दक्षिण मुंबई लोकसभा संपर्क प्रमुखपदी आमदार निलेश राणे; शिवसैनिकांकडून अभिनंदन

मुंबई (प्रमोद देठे) : शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार दक्षिण मुंबई लोकसभा संपर्क प्रमुखपदी शिवसेनेचे लोकप्रिय आमदार निलेश राणे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल शिवसैनिकांनी भेट घेऊनपुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी दक्षिण मुंबई सह लोकसभा प्रमुख दिलीप नाईक, माजी शाखाप्रमुख विजय घरत, विधानसभा समन्वयक सुदीप नाईक, उपविभाग प्रमुख प्रथमेश शाह, संकेत नेवशे, शाखाप्रमुख निलेश भोईटे, संतोष पवार, संतोष यादव, कविता मल्हार यांच्यासह शिवसैनिक चेतन घरत, सुधीर पोवळे आणि धीरज खुळे उपस्थित होते.
यावेळी निलेश राणे यांनी संघटन मजबूत करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना अधिक बळकट करण्यासाठी सक्रियपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. दरम्यान, आमदार निलेश राणे यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी काळात संघटनात्मक कामांना गती मिळणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *